वारजे परिसरात गोळीबार करून दहशत माजविणारा गुंड कार्तिक इंगवले आणि त्याच्या साथीदारांच्या विरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.
याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी दिला आहे. टोळीप्रमुख कार्तिक संजय इंगवले (वय 20), सनी बाळू शिंदे (वय 21), वैभव दत्तात्रय भाग्यवंत (वय 24,राहणार तिघे रामनगर, वारजे) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
इंगवलेने गेल्या महिन्यात वारजे भागात एका दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील रोकड लुटली होती.
दहशत माजविण्यासाठी त्याने पिस्तुलातून गोळीबार केला होता. इंगवले याच्या विरोधात लूट, खंडणी, खुनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. इंगवले आणि साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. हाके, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दत्ताराम बागवे यांनी तयार केला. संंबंधित प्रस्ताव अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे, उपायुक्त सुहेल शर्मा यांच्याकडे सादर करण्यात आला. या प्रस्तावास पोलिस आयुक्तांनी मंजुरी देऊन इंगवलेसह साथीदारांच्या विरोधात मोक्का कारवाई करण्याचा आदेश दिला.
0 Comments