देहुगाव बसस्थानकावर दोन महिलांचे 1 लाख रुपयांचे दागिने हिसकावले

 


याप्रकऱणी 61 वर्षीय महिलेने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जानेवारी रोजी 61 वर्षीय वृद्ध महिला देहूगाव बस स्थानकावरून आळंदीकडे जात होती. वृद्ध महिलेच्या गळ्यातील दोन तोळे आणि आणखी एक सोबत प्रवास कऱणाऱ्या महिलेचे दोन तोळ्याचे एकूण चार तोळे वजनाचे 1 लाख 20 हजार रुपयांचे मंगळसूत्र बसमध्ये चढत असताना चोरट्यांनी चोरून नेले.

देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments