काका मला वाचवा असे इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. परंतु पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात एका पुतण्याला काका मला मारु नका असे म्हणण्याची वेळ आली.
पुरंदर तालुक्यातील वागदरवाडी येथे काका आणि पुतण्यामध्ये शेत जमिनीचा वाद आहे. पुतण्या शेतजमिनीत आल्याचे पाहून काकाने पुतण्याच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. याप्रकरणी आरोपी काकाला अटक करण्यात आली आहे.
भास्कर त्रिंबक भुजबळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपी काकाचे नाव आहे. याप्रकरणी शारदा भुजबळ यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. या घटनेत शारदा भुजबळ आणि त्यांचा मुलगा स्वप्नील भुजबळ हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी 307, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोलीस कोठडी घेतली आहे. ही घटना शनिवारी (दि.7) दुपारी एकच्या सुमारास घडली आहे.
आरोपी भास्कर भुजबळ याने फिर्यादी शारदा भुजबळ यांच्या शेतात न विचारता उसाचे पिक घेऊन ऊस तोड सुरु केली होती.
ही ऊस तोडणी थांबवण्यासाठी फिर्य़ाद आणि त्यांचा मुलगा स्वप्नील हे काल शेतात गेले होते.
पुतण्या शेतात आल्याचे पाहून आरोपीने स्वप्नीलच्या अंगावर रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला.
यामध्ये स्वप्निल आणि शारदा भुजबळ हे जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments