टीम इंडियाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकरची मुलगी सारा तेंडूलकर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावरही ती नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावरही ती नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
जरी सारा फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असली तरी तिचं फॅन फॉलोईंग मात्र जबरदस्त आहे. सारा नेहमी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. साराने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती आपल्या लग्नाबाबत बोलताना दिसत आहे.
साराने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने लग्नाबाबत खुलासा केला आहे. व्हिडिओत सारा आपल्या मैत्रिणीसोबत दिसत आहे. साराने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे की, ती आपल्या मैत्रिणीपेक्षा जास्त पैसे खर्च करते. याचबरोबर ती असंही म्हणाली आहे की, ती तिच्या मैत्रिणीआधी लग्न करणार आहे. हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
याचबरोबर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी असल्याचं समोर आलं आहेत. हो परंतु हा दावा आम्ही नाही तर गुगलने केला आहे.
कारण जेव्हा तुम्ही गुगल सर्चमध्ये शुभमन गिल असं टाईप करतो, तेव्हा तिथे पुढे सजेशन म्हणून शुभमन गिल वाईफ असा उल्लेख येतो. ज्याला ओपन केल्यानंतर त्याच्या बायकोचं नाव म्हणून सारा तेंडूलकर येत आहे. परंतु आम्ही तुम्हाला सांगितो की, ही फक्त एक अफवा आहे.
हे गुगलने स्वत: घोषित केलं होतं. आम्ही तुम्हाला सांगतो की, या दोघांच्या नात्याबद्दल मीडियामध्ये अनेकदा हेडलाइन येत असतात. सचिनची मुलगी सारा तेंडुलकर क्रिकेटर शुभमन गिलची पत्नी झाली. मात्र ही संपूर्ण गोष्ट निव्वळ अफवा ठरली आहे. सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात आणि एकमेकांच्या फोटोंवर कमेंटही करतात.
0 Comments