प्रेम कुणालाच मुकल नाही. प्रत्येक जोडप्याचे आपल्या जोडीदारावर अंसख्य प्रेम असते. जितके प्रेम मनुष्याचे असते तितकेच प्रेम प्राणीमांत्राचे देखील असते.
नाग किंवा नागिणीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी ते असंख्य प्रयत्न करतात. अशी एक घटना बिलसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागला डल्लू गावातील एका समाधीजवळ घडली. नागिणीच्या मृत्यूनंतर तिचा प्रियकर अर्थाच नाग तिच्या जवळ तिचे रक्षण करत असताना दिसला.
या भागात नाग व नागिणीचे हे जोडप नेहमीच गावकऱ्यांना दिसायचे. परंतु, मुंगूसने या जोडीपैकी एकाला मारले व क्षणार्धात नागिणीचा मृत्यू झाला. तेव्हा पासून नागिणीचे रक्षण करताना साप दिसत आहे.
नागाचे नागिणीवर असलेल्या अपार प्रेमाची सत्य घटना इंटरनेटच्या माध्यमातून सोशल मीडियावरही पसरली. जिल्ह्यातील सापांच्या अनोख्या प्रेमाने लोकांना हैराण केले आहे.
हे दृश्य पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातूनही गर्दी जमली. युपीच्या नागला डल्लू गावातला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच सापचा त्रास कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी कसा तरी सापाचा मृतदेह तेथून बाहेर काढला आणि अंत्यसंस्कार केले. असे असतानाही साप घटनास्थळावरून हटला नाही. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नागाला देखील गंभीर जखम झाली आहे व त्याच्या जगण्याची आशा देखील कमी आहे. ही घटना पाहून अनेकांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले
0 Comments