रामनगर : बैलगाडी उलटून बैलहोंगल तालुक्यातील संपगाव येथील युवक ठार झाला. इरण्णा शिवबसय्य दोपडाल (वय २६) याचा मृत्यू झाला. जोयडा तालुक्यातील फंसोली क्रॉस येथे ही घटना घडली.
बैलगाडी रस्त्याशेजारी जाऊन उलटल्याने दगडावर डोके आदळून त्याचा जागीच मृत्यू झाला. उळवी चन्नबसवेश्वर यात्रेला जात असतानाही घटना घडली. सदर अपघात रविवारी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला. इरण्णासोबत त्याच्या घरातील इतर चार व्यक्तीही सोबत चालत जात होत्या. सदर घटना समजताच दांडेली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवचिकित्सेसाठी दांडेली येथील सरकारी इस्पितळात पाठवण्यात आला आहे.
0 Comments