कर्जत - साहेब आमच्या गावात गेली अनेक वर्षापासून अवैध दारूविक्री सुरु आहे. ती काही केल्या बंद होत नाही. म्हणून तुम्ही बंद करता का, आम्ही रस्त्यावर उतरु अशा शब्दांत रुईगव्हाण येथील ग्रामस्थांनी पिरफाट्यावरील दारू बंदीसाठी एल्गार पुकारला.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला गावातील तरुणांनी या दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामस्थांच्या मागणीवरुन मिरजगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी पथकासह येथे (दि. 2) संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तत्काळ छापे टाकले. मात्र, कारवाईत कोणताच मुद्देमाल सापडला नाही. याचे कारण पथक येण्यापूर्वीच मेसेज येथे पोहचला.
तोपर्यंत सगळे अलबेल झाले. उलट कारवाई अपेक्षित असताना नाराजी वाढली. पथक परत गेले की लगेच दारूची विक्री चालू झाली. हा येथील दारू विक्रेत्यांचा नियमित फंडा आहे. हा फाटा नव्यानेच झालेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. 548 डी वर येतो. याच तक्रारी वाढत असल्यामुळे तरुणांनी नवीन वर्षाच्या पुर्व संध्येला गावातील दारूबंदीचा निर्णय घेतला. तसे पोलिसांना पण कळवले. पण विक्रीत्यावर काहीच फरक झाला नसल्यामुळे ग्रामस्थ संतापले म्हणून साहेब आता तुम्ही तरी दारूबंद करा नाही तर आम्ही तरी आंदोलन करतो, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
अनेक तरुण हे दिवसेंदिवस दारूच्या व्यसनाच्या आहारी जात असल्यामुळे याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. त्यासाठी दारूबंदीची चळवळ उभी करणे गरजेचे आहे.
0 Comments