पतीचे आशीर्वाद घेताना पत्नीन केलं असं कृत्य

 


सोशल मीडियावर सातत्यानं अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यापैकी काही व्हिडिओ मजेदार आणि मनोरंजक असतात. सोशल मीडियावर कौटुंबिक तसेच पती-पत्नींचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.

व्हिडिओ प्रामुख्याने मनोरंजक आणि मजेदार असतात. या व्हिडिओजना नेटिझन्सकडून चांगली पसंती मिळत असते. पत्नीचे रुसवेफुगवे, पती-पत्नीचे किरकोळ गोष्टींवरून होणारे वाद आदी विषय या व्हिडिओजमध्ये दिसतात. सध्या एका पती-पत्नीचा एक गमतीदार व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहताना तुम्हालादेखील हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ नेटिझन्सच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओला हजारांवर लाईक मिळाल्या आहेत. या व्हिडिओत नेमकं काय चित्रित झालंय, ते जाणून घेऊया.

जर तुम्ही इंटरनेटवर अ‍ॅक्टिव्ह असाल तर संस्कारी पत्नींचे अनेक व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहिले असतील. अशाच एका व्हिडिओमध्ये पत्नी सकाळी उठल्यावर सर्वप्रथम पतीच्या पायाला स्पर्श करून त्याचे आशिर्वाद घेताना दिसते. पती देखील अंथरूणावर पडून हात उंचावत पत्नीला आशीर्वाद देताना दिसतो. पण पुढे एक गमतीदार घटना घडते.

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हा मजेदार व्हिडिओ इन्स्टाग्रामवर Funtaap नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला असून, लोकांना तो खूप आवडत आहे. या व्हिडिओत, पत्नी पतीच्या पायवरील चादर बाजूला करून पायाला स्पर्श करत त्याचे आशिर्वाद घेत आहे. पतीदेखील झोपून हात उंचावत पत्नीला आशीर्वाद देताना दिसत आहे.

मात्र काही क्षणातच चित्र पालटतं. पतीने कधीच विचार केला नसेल असे कृत्य त्याच्यासोबत घडतं. व्हिडिओत पत्नी खोलीत येते आणि अत्यंत प्रेमानं पतीच्या पायांना स्पर्श करत त्याचा आशीर्वाद घेताना दिसते. माझ्या पत्नीसारखी संस्कारी स्त्री या जगात असूच शकत नाही, असा विचार कदाचित यावेळी पतीच्या मनात आला असेल.

पण अचानक पत्नीच्या अंगात बॉक्सर माइक टायसन संचारतो आणि क्षणात पत्नी पतीचे पाय ओढून त्याला घरातून बाहेर फेकते. संस्कारी पत्नीचं हे रुप पाहून पती घाबरून जातो.

Post a Comment

0 Comments