यातील सहा ही आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. संकेत अशोक लोखंडे (वय 20 रा.रहाटणी), सचिन तुकाराम शिंगे (वय23 रा. रहाटणी), अक्षय राजू खताळ (वय 21 रा. रहाटणी), ओकार आबासाहेब पांडुळे (वय 21 रा.रहाटणी), भरत मुकंदा चौधरी (वय 19 रा.रहाटणी),करण परमेश्वर गवाडे (वय 19 रा. थेरगाव) अशी अटक आरोपींची नावे असून मयूर किरण पाटील (वय 2 रा. रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व जखमी तरुण शुभम भिला चव्हाण (वय 17) हे आरोपी हे एकाच वर्गात शिकत आहेत. यावेळी फिर्यादी व त्यांचा मित्र शुभम हे संकेत च्या मैत्रिणीला बोलले, याचाच राग मनात धरून आरोपीने त्याचे साथीदार बोलावून फिर्यादी व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्या व दगडाने मारहाण करत जखमी केले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
0 Comments