औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तरुणावर भरचौकात प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी या ठिकाणी घटना घडली आहे.
योगेश मस्के असे प्राणघातक हल्ला करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने योगेश मस्के याच्यावर हा हल्ला केला आहे. याप्रकरणी औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथे योगेश मस्के या तरुणावर रांजणगाव शेंनपूजी येथील मुख्य वर्दळीच्या चौकात चार ते पाच व्यक्तींनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्याप्रकरणी औरंगाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या हल्ल्यात जखमी झालेल्या योगेश मस्के याला तातडीने शासकीय घाटी रुग्णालयात पुढील उपचारासाठी
दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी वाळूज पोलीस स्टेशनचे
पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी पाहणी केली. एमआयडीसीमध्ये झालेल्या घटनेचा वाळूज पोलीस कसून तपास करत आहेत.
0 Comments