शेतीच्या वादातून भावकीत तुंबळ हाणामारी , चार जण गंभीर जखमी

 


शिरुर तालुक्यातील नव्याने स्थापण झालेल्या शरदवाडी या गावामध्ये शेती व घराच्या वादातून भावकीमध्ये कुऱ्हाड, लाकडी दांडके, खोरे, कोयता, लोखंडी गज यांच्या सहाय्याने तुंबळ हाणामारी केल्याने एका गटाचे चार जण गंभीर जखमी झाले असून फिर्यादी राहुल बाळू थोरात यांनी दुसऱ्या गटातील पाच जणांवर शिरुर पोलिस स्टेशन येथे गुन्हे दाखल केले आहेत.

इस्टेटीच्या वादातून भाऊच भावाचा पक्का वैरी झाला असून रागाच्या भरात तुंबळ हाणामारीमुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की (दि. १०) रोजी सायंकाळी ०७ वा. च्या सुमारास फिर्यादीचे वडील बाळू थोरात घरी असतांना फिर्यादी राहुल थोरात यांचे चुलते शहाजी थोरात त्यांची दोन मुले १) अमोल शहाजी थोरात २) नितीन शहाजी थोरात व दुसरे चुलते दिलीप निवृत्ती थोरात व त्यांचा मुलगा गणेश दिलीप थोरात असे सर्वजण मिळून फिर्यादीच्या घरी आले. व त्यातील दिलीप थोरात यांनी फिर्यादीच्या वडीलांना पकडून त्यांचा मुलगा गणेश याने उलट्या कु-हाडीने फिर्यादीच्या वडीलांना मारत असताना डोक्यात कु-हाड मारणार एवढ्यात त्यांच्या वडीलांनी हात मध्ये घातला असता कुऱ्हाडीचा दांडा त्यांच्या डाव्या हातावर लागून त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्याचवेळी तेथे उपस्थित दिलीप थोरात याने त्याच्या हातातील कोयत्याने फिर्यादीच्या वडीलांच्या मांडीवर मारले. कोयत्याचा घाव निसरता झाल्याने मांडीला जखम झाली नाही.

दरम्यानच शहजी थोरात यांनी फिर्यादीच्या वडीलांच्या पायावर खोरे मारले त्यामुळे त्यांच्या पायाला मुक्का मार लागला. तेव्हा तेथेच आमोल थोरात हातात लोखंडी गज, व नितीन थोरात लाकडी दांडके घेवून उभा होता. तेव्हा फिर्यादीव त्यांची आई व पत्नी असे वडीलांना सोडवण्यासाठी त्यांच्याकडे जात असतानाच त्यातील आमोल थोरत याने फिर्यादीच्या पाठीवर त्याच्या हातातीवर लोखंडी गजाने फटका मारला, व नितीन थोरात याने पाठीत लाकडी दांडके मारले त्यामुळे फिर्यादीला मुक्का मार लागला आहे. त्याचवेळी चुलते शहाजी थोरात यांनी फिर्यादीच्या पायावर व छातीवर खोरे मारले. दरम्यान फिर्यादीची आई व पत्नी वडीलांना सोडवण्यासाठी जावू लागल्या असता शहाजी थोरात व अमोल थोरात याने फिर्यादीच्या आईला दोन वेळा धरुन खाली पाडले.

तेव्हा फिर्यादीची पत्नी घरात जावून मोबाईलचा कॅमेरा चालू केला आणी जाळीच्या दरवाजाच्या आतूनच रेकॉर्डींग करू लागली असता, तेव्हा दिलीप थोरात यांनी हिच्याकडे पण पहा कॅमेरा चालू केला आहे असे बोलला. त्याचवेळी नितीन व दिलीप यांनी फिर्यादीला पकडून ठेवले आणी शहाजी हे दरवाजा उघडून फिर्यादीच्या घरात गेले आणी पत्नीचे हातातून मोबाईल खाली पाडला व दोघांनीही पत्नीस हाताने मारहाण करुन गळ्यातील मंगळसुत्र तोडून त्याचे नुकसान केले आणी तरी वाचलात पुन्हा तर कसे वाचता तेच पाहतो अशी धमकी देवून निघून गेले म्हणून त्यांच्याविरोधात फिर्यादी राहुल बाळू थोरात यांनी कायदेशीर तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास टाकळी हाजी औट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक सुनिल उगले हे करत आहे.


Post a Comment

0 Comments