सोशल मीडियावर माकडांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. कधी झाडावर लटकताना, कधी उड्या मारताना तर कधी वाकुल्या दाखवतानाचे अनेक व्हिडिओ आत्तापर्यंत पाहिले असतील.
या व्हायरल व्हिडिओमध्ये ती माकडिण आपल्या पिल्लाला अनोखळी व्यक्तींकडून खायला घेवू नकोस, असेच बजावताना दिसत आहे
अनोळखी व्यक्तीने दिलेलं कधी खायचं नाही, अशी सुचना आपल्या आई वडिलांकडून अनेकदा ऐकतो. प्रवासात किंवा बाहेर पडताना आपल्याला याबद्दल आई वडिल अनेकदा बजावताना दिसतात. हाच धडा आपल्या पिल्लाला देणाऱ्या माकडिणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत एक व्यक्ती आपल्या हातातील खाऊ समोर बसलेल्या माकडाच्या पिल्लाला देतो. तो हातातील खाऊ तो पिल्लाच्या समोर पकडतो. ते लहान पिल्लूही खाऊ घेण्यासाठी धावते. मात्र त्या पिल्लाची आई त्याला जोरात मागे खेचते. ते पिल्लू पुन्हा पुन्हा खाऊ घ्यायला धावते मात्र ती माकडिण काही त्याला तो खाऊ खायला सोडत नाही.
इतकेच नव्हेतर त्या पिल्लाला खायला देणाऱ्या व्यक्तीवरही ती माकडिण जोरात ओरडताना दिसत आहे. हा गोड व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी त्यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.
0 Comments