3 दिवसात 3 भीषण अपघात , दोघींनी सोडला जीव , तिसरी रुग्णालयात देतेय झुंज

 


देशात विविध अपघाताच्या घटनांमधील तीन मुलींचा अपघाती मृत्यू झाला आहे. पहिला अपघात हा दिल्लीतील कंझावला रोडवर झाला. पहिल्या अपघातातील युवतीची कवटी पूर्णपणे फुटली होती, ब्रेन मॅटर गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

20 वर्षीय अंजलीच्या या अहवालात अशा भयानक आणि गंभीर जखमांचा उल्लेख करण्यात आला आहे. तर दुसरी घटना ग्रेटर नोएडातील आहे. या अपघातात कार चालकाने चाकात अडकलेल्या तरुणीला तब्बल 12 किमीपर्यंत फरफटक नेलं.

यात तिचा जागीच मृत्यू झाला. तर तीच्यासोबत आणखी दोघे मृत्यूशी झुंज देत आहेत. या घटनेची नोएडा आणि परिसरात जोरदार चर्चा झाली होती. तर तिसरी घटना ही चेन्नईतील आहे. आपल्या भावाला सोडण्यासाठी जाताना खड्डा चुकवताना शोबनाचा मृत्यू झाला आहे. ती खड्डा चुकवताना मोपेडवरून खाली पडली अन् तीच्या अंगावरून ट्रक गेल्याने तीचा जागीच मृत्यू झाला. या तीन्ही घटना मागच्या चार दिवसात घडल्याने देश अपघाताच्या घटनांनी हादरला आहे.


Post a Comment

0 Comments