प्रेमविवाह करणाऱया युवकाला मुलीचा भाऊ व त्यांच्या कुटुंबीयांकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याप्रकरणी या युवकाने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दिली आहे.
गणेश मारुती कासार असे या युवकाचे नाव आहे.
कासार यांनी काही वर्षांपूर्वी सर्जेपुरा गोकुळवाडी येथील एका मुलीशी प्रेमविवाह केला होता. लग्नाला दोन-तीन वर्षे होऊन एक मुलगी झाली असतानाही मुलीच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध कायम आहे. विवाह मान्य नसल्याने तिचा भाऊ व कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी कासार याला गोकुळवाडी येथे राहण्यास मज्जाव केला होता, तर कुटुंबीयांना मारहाणदेखील केली होती. सूरज गोंधळी, निशांत गोंधळी व वसंत गोंधळी यांच्यावर तोफखाना, एमआयडीसी व कोतवाली पोलिसांत अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांची सर्जेपुरा भागात दहशत असून, त्यांच्यापासून मला व माझ्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप गणेश कासार यांनी केला आहे.
0 Comments