फेसबुकच्या माध्यमातून विश्वास संपादन करून फ्रेंडशीप केली .जेवणाच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये भेटून चोरी करून पसार झालेल्या महिलेला अखेर पोलिसांनी शोधून काढले .तिला आणि तिच्या साथीदाराला मानपाडा पोलिसांनी गोवा येथे जावून अटक केली.
खार येथे राहणार्या समृध्दी खडपकर (29 ) आणि गोवा येथे राहणारे विलेंडर विल्फड डिकोस्टा (34 ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
डोंबिवलीत राहणार्या महेश पाटील यांची समृध्दी खडपकर यांच्यासोबत फेसबुकवरून ओळख झाली. ओळखीचे मैत्रीत रुपांतर झाल्याने समृध्दी यांनी पाटील यांना खोणी गावातील एका हॉटेलमध्ये भेटायला बोलावले. पाटील यांच्याबरोबर गप्पा गोष्टी करत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. त्यानंतर त्यांच्यावर प्रेम करते, असे सांगून त्यांना हॉटेलच्या खोलीत घेऊन गेली. काही वेळाने पाटील हे बाथरूममध्ये गेले असता त्यांच्याकडे असलेले परवानाधारक पिस्तूल, सॅमसंग फोल्ड-3 मोबाईल, सोन्याच्या तीन चेन, हातातील सोन्याचे कडे, एक टायटन कंपनीचे घडयाळ असा 4 लाख 75 हजार रुपये किंमतीचा ऐवज घेवुन ती तेथुन पळुन गेली.
सदर महिलेचा कोणताही मोबाईल फोन नंबर अथवा तिचा कोणताही पत्ता पाटील यांच्याकडे नव्हता. अखेर पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली .चोरलेल्या पिस्तुलचा ही महिला गैरवापर करण्याची दाट शक्यता होती. घटनेचे गांभीर्य ओळखुन मानपाडा पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देत तपास करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार फिर्यादी यांनी फेसबुकचे माध्यमातुन सदर महिलेस संपर्क केला.
त्यावरुन सदर महिलेचा शोध घेण्यास सुरवात करण्यात आली. तिचे फेसबुक अकाऊंट चेक करुन तिच्या नावाची खात्री केली.त्यावेळी तिच्या नावावर आणखी एक गुन्हा असल्याचे आढळून आले. तसेच ही महिला खारला राहत असल्याचे समजले.मात्र त्या पत्त्यावर गेल्यानंतर ही महिला गोवा येथे गेल्याचे पोलिसांना कळले .त्यानंतर पोलिसांनी गोवा येथून या महिलेला आणि तिला मदत करणार्या साथीदाराला देखील अटक केली आहे.तपासा दरम्यान आरोपीने मी चोरी करत असे व त्यानंतर या वस्तू गोव्याला राहणार्या साथीदाराला देऊन तो वस्तू विकत असल्याचे तिने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली.
0 Comments