प्रियकरासोबत लग्न करण्यासाठी तरूणीने केली चोरी

 


मध्य प्रदेशच्या इंदुरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने आपल्या नातेवाईकांच्याच घरी चोरी केली.

पीडित महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली, ज्यात सांगण्यात आलं की, त्यांच्या घरी रहायला आलेल्या नातेवाईक तरूणी तिच्या प्रियकरासोबत मिळून घरात चोरी केली.

महिलेने पोलिसांना सांगितलं की, तक्रार दाखल करण्याआधी महिलेने तरूणीला फोन करून दागिने आणि रोख रक्कम परत करण्यास सांगितलं होतं. यावर तरूणी म्हणाली की, तिला पैशांची आणि दागिन्यांची गरज होती. ती लवकरच ते परत करेल. त्यानंतर तिने तिचा मोबाइल बंद केला.

पोलिसांनी तरूणीवर गुन्हा दाखल करत तिचा शोध घेणं सुरू केलं आहे. सोबतच तिच्या परिवारातील लोकही तिचा शोध घेत आहेत. महिलेने सांगितलं की, 18 जानेवारीला तिच्या घरी अंजली उर्फ टुकटुक आली होती.

दोन दिवसांनंतर ती घरातून कुणाला काही न सांगता गपचूप निघून गेली. जेव्हा महिला घरी पोहोचली तेव्हा सगळ्या वस्तू घरात पडून होत्या. कपाटात ठेवलेले 1 लाख 80 हजार रूपये आणि 1 लाख 20 हजार रूपयांचे दागिने गायब होते.

पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्या दूरच्या एका नातेवाईकांची मुलगी इंदुरमध्ये शिकत आहे. ती एका खाजगी समस्येमुळे 2 दिवसांसाठी त्यांच्या घरी थांबण्यासाठी आली होती. परिवारातील लोक जेव्हा कामासाठी बाहेर गेले तेव्हा तरूणीने रोख रक्कम आणि दागिने लंपास केले. असं सांगण्यात येत आहे की, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी तरूणीने ही चोरी केली.


Post a Comment

0 Comments