एका स्कुटीवर बसले पाच तरुण, रस्त्यात केला भयानक स्टंट

 


सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका स्कुटीवर पाच तरुण बसले आहेत.

त्याचबरोबर ते स्टंट करीत आहेत. रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या एका मित्राने तो व्हिडीओ शूट केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस तरुणांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे स्टंट केलेल्या तरुणांनी स्वत: चं तो व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांनी तरुणांवरती कारवाई करावी असं आवाहन केलं आहे. हा व्हिडीओ दिल्लीतील असून पोलिस त्या तरुणांचा शोध घेत आहेत.

एकोणीस सेंकदाचा तो व्हिडीओ आहे. त्यामध्ये तरुण स्कुटीला लटकून प्रवास करीत आहेत. त्यानंतर त्यांच्यातला एक तरुण स्कुटीवर उभा राहत आहे. काही तरुणांनी तो व्हिडीओ ट्विटरच्या माध्यमातून आयुक्तांपर्यंत पोहोचवला आहे. पोलिस स्कुटीच्या नंबरवरुन तरुणांचा शोध घेत आहेत. डीसीपी अशितोष यांनी सांगितलं की, आम्ही लवकरचं तरुणांना ताब्यात घेऊ, त्याचबरोबर हा व्हिडीओ जुना असल्याचं सुध्दा सांगितलं आहे.

युपी बाईकवरती काही तरुण रील्स तयार करीत होते. त्यावेळी त्या तरुणांवरती सुध्दा पोलिसांनी कारवाई केली होती. त्याचबरोबर त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात आला होता.

Post a Comment

0 Comments