कामावर जायला उशिर झाल्यानंतर अनेकजण धावत जाऊन प्रवास करतात. परंतु हा धावता प्रवास करीत असताना आपल्या आजूबाजूच्या वाहनांची आणि आपली काळजी घ्यायला विसरतात
नाला सोपारा येथे राहणाऱ्या 35 वर्षीय शिक्षका बोरिवली रेल्वे स्थानकावर धावती लोकल पकडत होत्या. त्यावेळी त्यांना ट्रेनची जोराची धडक बसली. त्यानंतर तिथल्या काही महिलांनी शिक्षिकेला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयात नेल्यानंतर त्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू झाला.
विरारला जाणारी फास्ट लोकल बोरिवली रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून निघाली आहे. त्याचवेळी आरडाओरडा झाल्याने काही लोकांनी पाठीमागे वळून पाहिले. त्यावेळी एका महिलेला ट्रेनची जोराची धडक बसली होती. तेवढ्यात दोन महिलांनी शिक्षिकेला मागे ओढले आणि पाणी पाजले. ही घटना 10 जानेवारीला घडली होती. त्यानंतर शिक्षिकेवरती उपचार सुरु होते.
0 Comments