सहलीच्या बसचा अपघात....

 


पुणे-बंगळूर महामार्गावर बेलवडे हवेली ( ता. कराड) गावच्या हद्दीत हॉटेल राजस्थानी राजपुरोहीत धाब्यासमोर विद्यार्थ्यांच्या सहलीची बस व कंटेनरचा भीषण अपघात झाला.

अपघातात तीन विद्यार्थी आणि तीन शिक्षक जखमी झाले आहेत. ही दुर्घटना आज ( दि. १८ ) सकाळी सातच्‍या सुमारास घडली.

वाघोली ( ता. कोरेगाव जि. सातारा ) येथील विद्यार्थी बसने सहलीला जात होते. राजस्थानी हॉटेल समोर अचानक कंटेनर महामार्गावर आल्यामुळे बस कंटेनरला जाऊन धडकली. या अपघातात तीन विद्यार्थी आणि तीन शिक्षक जखमी झाले आहेत. जखमींवर कराड व सातारा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Post a Comment

0 Comments