पोलिस असल्याचे सांगून ज्येष्ठाला लुटले

 


मी क्राईम ब्रँचचा पोलिस आहे. येथे काल चोरीचा प्रकार घडला आहे. तुम्ही तुमच्या गळ्यातील लॉकेट व हातातील अंगठी काढून रुमालामध्ये ठेवा, असे ज्येष्ठाला सांगत हातचलाखीने त्यांच्याकडील दोन तोळे वजनाचे 40 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याचा प्रकार बारामती शहरात घडला.

याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघा अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल गोविंद पोतेकर (वय 70, रा. माऊली बंगला, पूर्वा कॉर्नरशेजारी, बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

पोतेकर हे कटिंग, दाढी करण्यासाठी पूर्वा कॉर्नरनजीक एका दुकानाकडे निघाले होते. या वेळी दुचाकीवरून एक इसम आला. त्याने येथे काल चोरीचा प्रकार घडला आहे.

 मी क्राईम ब्रँचचा पोलिस आहे. तुमच्याकडील दागिने रुमालात ठेवा, असे सांगितले. यादरम्यान त्याने कसले तरी ओळखपत्र दाखवत फिर्यादीचा विश्वासन संपादन केला.

फिर्यादीने गळ्यातील सोन्याची साखळी व हातातील अंगठी, मोबाईल व पाकीट हे रुमालामध्ये बांधले. या वेळी तेथे अन्य एक अनोळखी आला. त्याने तेथे अगोदर उपस्थित असलेल्याला येथे झालेल्या चोरीचे काय झाले, असे म्हणत पोतेकर यांच्याकडील रुमाल दुचाकीवर ठेवला. नंतर त्यांना तो परत देत ते लागलीच तेथून पसार झाले. फिर्यादीने रुमाल उघडून बघितला असता त्यात मोबाईल व पाकीट होते. परंतु, सोन्याची साखळी व अंगठी चोरीला गेल्याचे दिसून आले.


Post a Comment

0 Comments