खतरनाक! डान्स करताना घडलं विपरीत ..... अचानक छतालाच लटकली ' ही , तरुणी

 


सध्या जमाना आहे तो म्हणजे व्हिडीओचा. सोशल मीडियावर सध्या नानातऱ्हेच्या व्हिडीओंची  चलती आहे त्यामुळे आपल्यालाही असे व्हिडीओ पाहून कधी हसायला येतं, रडायला येतं नाहीतर भिती वाटते.

सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ  पाहून भल्याभल्यांची झोप उडाली आहे. या व्हिडीओत एक तरूणी अचानक नाच करता करता कपाटावर चढते आणि कपाटावर जाऊन थेट छतावर लटकायचाच  प्रयत्न करते. तुम्हाला हा व्हिडीओ पाहून दोन मिनिटं आश्चर्याचा धक्काच बसेल परंतु हा व्हिडीओ ट्रेडिंग ठरला आहे. हा व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नाच करणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ पाहून ही कोणाची बेस्ट फ्रेंड आहे, गमतीशीर वाक्य टाकलं आहे. हा व्हिडीओ सध्या सगळीकडे वेड्यासारखा व्हायरल होतो आहे. 

हा व्हिडीओ इन्टाग्रामवर सध्या व्हायरल होतो आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत मुलगी खरंच भूतासारखी छताला लटकल्याचं नेटकऱ्यांना जाणवतं आहे. परंतु हे काही भूत नाही. ही मुलगी सुरूवातीला वेड्यासारखी डान्स करताना दिसत आहे, त्यानंतर अचानक ती कपाटावर जाऊन चढते आणि मग कपाटावर असलेल्या छताला जाऊन लटकते. लटकलेल्या अवस्थेत असतानाही ही मुलगी गोल गोल फिरतानाही दिसते आहेत आणि त्यानंतर परत ती विचित्र डान्स  करताना दिसते आहे. या व्हिडीओत या मुलीचा अतरंगी डान्स पाहून काही नेटकरी घाबरले आहेत तर काहीजण तिच्या या विचित्र डान्सवर खो खो हसत आहेत. त्यामुळे या व्हिडीओची सध्या एकच चर्चा सुरू झाली आहे.

हा व्हिडीओ पाहून काहींना यात ऍनिमेशन केल्याचं जाणवतं आहे तर काहींना यात व्हिएफएक्स केल्याचं जाणवतं आहे. तर काही लोकं हा व्हिडीओ फास्ट फॉरवर्ड केल्याचं दिसते आहे. परंतु यावर केलेलं एडिटींग काहीही असलं तरी सध्या या व्हिडीओवर सगळीकडे तूफान हास्याचा फवारा उडाला आहे. या व्हिडीओ पाहून आणि मुलीचा डान्स पाहून हिच्या काय भूत संचारलं आहे का असं म्हणत आहेत तर काही जण हिला वेड लागलं असल्याचं म्हणतं आहेत. जमिनीवर उडी मारल्यानंतरही ही मुलगी विचित्र पद्धतीनं डान्स करताना दिसते आहे. त्यामुळे एकच हशा उडाला आहे. यावर व्हिडीओवर अनेक लोकं हटके कमेंट्सही करत आहेत. एकानं हा व्हिडीओ पाहून असं म्हटलं आहे की, हे व्हिएफएक्सचं भूत आहे का भूताची सावली.

Post a Comment

0 Comments