हृदय पिळवटून टाकणारी घटना, निर्दयी आईनं पोटच्या 4 महिन्याच्या चिमुरड्याची फावड्यानं केली हत्या

 


पोटचा चार महिन्यांचा गोळा (मुलगा) इतका वाईट असू शकतो? आपल्याच मुलाची फावड्यानं हत्या करताना आईला काहीचं कसं वाटलं नसेल? पण, ही घटना खरीये आहे.

यामागं अंधश्रद्धेचं कारण असल्याचं बोललं जात आहे.

आपल्या मुलाच्या मृत्यूनंतर आई अस्वस्थ आहे. या घटनेनंतर ती त्याच पिंपळाच्या झाडाखाली बसून आहे, जिथं तिनं आपल्या मुलाची क्रुरतेनं हत्या केली. पोलिसांनी त्या निर्दयी आईला अटक केलीये.

धनौडीह गावात रविवारी सकाळी ही हृदयद्रावक घटना घडलीये. एका आईनं आपल्या चार महिन्यांच्या चिमुकल्या प्रीतमची फावड्यानं हत्या केली. पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून या घटनेचं कारण अंधश्रद्धा असल्याचं बोललं जात आहे. ही बाब लोकांना समजताच परिसरात खळबळ उडालीये. घराशेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाच्या खाली आईनं आपल्या मुलाची हत्या केली. मांत्रिकाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याची चर्चा आहे.

पोलीस ठाण्याचे प्रमुख राघवेंद्र रावत यांनी सांगितलं की, आरोपी मंजूला अटक करण्यात आली आहे. गावातील रहिवासी असलेले शिवकुमार कानपूरमध्ये रोजंदारी मजूर म्हणून काम करतात. दिवाळीपासून ते कुटुंबापासून दूर आहेत. पत्नी मंजू उर्फ ​​राधा ही गावात मुलांसोबत राहते. पोलीस अधीक्षक सोमेन बर्मा म्हणाले, 'चौकशीत अंधश्रद्धेशी संबंधित प्रकरण उघडकीस येत आहे. पोलीस कायदेशीर कारवाई करत आहे.'


Post a Comment

0 Comments