सोशल मीडियावर रोज कोणते ना कोणते व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशातच वयाची सत्तरी पार केलेल्या आजीबाईंचा कबड्डी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
हौसेला वय नाही" ह आपण नेहमी ऐकत असतो मात्र त्याची वास्तविक प्रचिति गोंदिया जिल्ह्यात आली असून चक्क 78 वर्षीय आजी कबड्डी स्पर्धेसाठी मैदानात उतरल्याचे एका व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गोदिंया जिल्ह्यातील दुर्गम असलेला सालेकसा तालुक्यातील नानव्हा गावातील 78 वर्षाच्या तारणबाई येडे स्ञी मुक्ती दिनानिमित्य अविचित्य साधुन आयोजित कब्बडी स्पर्धेत सहभाग नोदंवुन भाग घेतला वयाचे बंधन न बाळगता ह्या आजिबाई एका कुशल कबड्डी पटू प्रमाणे डाव टाकताना दिसत आहे.
आयुष्यात अनेक सुखदुःखच्या अनुभवाची शिदोरी असलेली या आजिच्या चेहऱ्यावरचा आनंद पहाण्यासारखा होता. आता या कबड्डी खेळण्याऱ्या आजीचा वीडियो चांगलात वायरल होत असून नेटकऱ्यांनी आजीला दाद दिली आहे. आताची पीढी या वयात इतकी निरोगी असेल की नाही याबाबत शंका आहे.
0 Comments