शहरातील तांबापुरा फुकटपुरा भागात दारू पिण्यासाठी शंभर रुपये दिले नाहीत, म्हणून तरुणावर तलवार हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयिताला परिसरातील तरुणांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले
तांबापुरा परिसरात विकार खान कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. बुधवारी (ता. २५) सायंकाळी सातच्या सुमारास एका तरुणाने त्याला शंभर रुपये मागितले. त्याने पैसे दिले नाहीत, म्हणून त्याच्या राग येऊन इस्तियाक अली राजिक अली (वय २६) याने हातात तलवार घेऊन विकार खान याचे घर गाठले.
पैसे दिले नाहीत, म्हणून तलवार हल्ल्याच्या प्रयत्नात असताना, परिसरातील तरुणांनी त्याला पकडले.
एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती कळविल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक मुदस्सर काझी, इम्रान सय्यद, सुधीर सावळे, गोंविदा पाटील यांनी धाव घेत संशयित इस्तियाक अली यास तलवारसह ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम रात्रीपर्यंत सुरू होते.
0 Comments