सिटी बसची धडक, युवतीचा रुग्णालयात मृत्यु

 


सिटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात जखमी झालेल्या युवतीवर नगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

तिचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. रविना विठ्ठल सुद्रिक असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. 

रविना ही शहरातील एका खासगी रुग्णालयात नोकरीस होती. नोकरीच्या निमित्ताने ती केडगाव येथे वास्तव्यास होती. तेथून नेहमीप्रमाणे कामावर येण्यास ती घरातून बसने प्रवास करीत हाेती. सिटी बस  प्रेमदान चौकात आली.

रविना सिटी बसमधून उतरून रुग्णालयाकडे जात असताना ज्या बसमधून ती आली त्याच बसची तिला पाठीमागून धडक बसली. त्यात ती गंभीर जखमी  झाली. या अपघातनंतर तिला एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले हाेते. तिचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. रविना हिचे वडील  विठ्ठल सुद्रिक यांनी सिटी बस चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Post a Comment

0 Comments