मुलीला वाचवण्यासाठी आईने विहिरीत उडी घेतली .... त्यानंतर जे झालं ते दुर्दैवीच !

 


विहिरीतून पाणी काढताना मुलीचा तोल जाऊन मुलगी पाण्यात पडली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता आईने मुलीला वाचवण्यासाठी उडी घेतली. मात्र दुर्दैवाने यात आईचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज बुलढाण्यात उघडकीस आली आहे.

सुदैवाने मुलगी वाचली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोंटी येथे घडली आहे. बेबीताई उमा खताळ असे बुडून मृत्यू झालेल्या 40 वर्षीय आईचे नाव आहे. याप्रकरणी खामगाव पोलिसात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खामगाव येथील कोटी गावातील बेबीताई खताळ सकाळी आपल्या 14 वर्षाच्या मुलीसोबत शेतात गेल्या होत्या. यावेळी त्यांची मुलगी शेतातील विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेली असता तिचा तोल गेला आणि ती पाण्यात पडली.

यावेळी बेबीताई यांनी मुलीला पाण्यातून बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण त्यांना यश येत नव्हते. मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याचे पाहून कोणताही विचार न करता क्षणार्धात आईने विहिरीत उडी घेतली.

पाणी खोल असल्यामुळे उडी घेताच त्या पाण्याच्या तळाशी गेल्या. तळाशी अडकल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलीने कडा पकडून ठेवल्याने तिचा जीव वाचला आहे.

पीडित कुटुंब हे शेती आणि मेंढी पालनाचा व्यवसाय करते. शेताच्या जवळच झोपडी बांधून राहतात. काल सकाळी बेबीताई या आपल्या दहावीत शिकणाऱ्या मुलीला घेऊन शेतावर फेरफटका मारायला गेल्या. यावेळी ही दुर्दैवी घटना घडली.

Post a Comment

0 Comments