शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन अहमदनगर ते पुणे एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवासी महिलेचा अज्ञात व्यक्तीकडून एस टी बसमध्ये विनयभंग झाल्याचा प्रकार घडला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पुणे नगर महामार्गावरुन प्रवास करताना अहमदनगर येथून एम एच ४० एन ९३५० या एसटी मधून सदर प्रवासी महिला प्रवास करत होती, सदर मार्गावर महिलेच्या पाठीमागील शिटवर बसलेल्या इसमाने महिलेच्या शरीराला स्पर्श करत महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले त्यानंतर शिक्रापूर येथे आल्यानंतरही पुन्हा तोच प्रकार घडल्याने महिलेने एसटी वाहकाला हा प्रकार सांगून शिक्रापूर पोलीस स्टेशन समोर एसटी थांबवली. यावेळी महिलेसह काही व्यक्ती व वाहक हे पोलीस स्टेशनमध्ये जात असताना विनयभंग करणारा व्यक्ती पळून गेला.
याबाबत सदर महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार नवनाथ नाईकडे हे करत आहे.
0 Comments