भरधाव ट्रक अन् तरुण - तरूणीसोबत घडलं भयानक...

 


राज्यात अपघाताच्याही घटना सातत्याने घडत आहेत. नुकताच जालना जिल्ह्यात झालेल्या अपघातात एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने जीव गमाला होता.

घटना ताजी असतानाच रस्ता ओलांडणाऱ्या दोघांना भरधाव ट्रकने चिरडले आहे. या भीषण अपघातात तरुण-तरुणी जागेवरच ठार झाले आहेत.22 वर्षीय तरूण आणि 16 वर्षीय तरूणी औरंगाबादकडे जात होते. या दोघांना मालवाहू ट्रकने चिरडले.

हा अपघात एवढा भीषण होता की, गंभीर जखमी झालेले तरुण आणि तरुणी दोघे जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतातील तरूणाची ओळख पटू शकली नाही. तर पोलिसांना मुलीचे आधार कार्ड मिळाले असून त्यानुसार मुलगी ही दिल्ली येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

हे दोघे या ठिकाणी का आले याबाबतही पोलिसांना माहिती मिळू शकली नाही. फुलंब्री पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत बैलगाडी आणि दुचाकीच्या धडकेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनिता ईश्वरसिंग ढोबाळ असे अपघातात मृत्यू झालेल्या या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे.

ढोबाळ या त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. सुनिता या त्यांच्या मुलासह दुचाकीवर मूळ गावाहून जालना येथे कर्तव्यावर जात होत्या. यावेळी त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता. तसेच तो ही दुचाकी चालवत होता.

दरम्यान, राजूरजवळ बैलगाडीला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात सुनिता ढोबाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्या भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथील रहिवासी होत्या. मृत पोलीस कर्मचारी सुनिता ईश्वरसिंग ढोबाळ यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे. दरम्यान त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच पोलील दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


Post a Comment

0 Comments