उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हरदोई येथील एका तरुणाने आपल्या फेसबुक अकाऊंटवर ‘लव यू जानू’ असे स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जगदीशपूर येथील रहिवासी योगेंद्र यादव याने फेसबुकवर राज यादव नावाने अकाऊंट बनवले होते. या अकाऊंटवरुन 'लव यू जानू' और आगे '22 को नहीं आज ही मरने वाला हूँ..' लिहून पोस्ट शेअर केली होती. याशिवाय त्याने फेसबुक दोन व्हिडिओही शेअर केले होते, ज्यात तो गाणे म्हणत आहे
यानंतर शनिवारी कस्तुरबा गांधी कन्या शाळेच्या मागे गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुण लटकत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. तरुणाच्या मृत्यूची माहिती मिळताच परिसरातील लोकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.
पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
तरुणाची फेसबुकवरील पोस्ट आणि व्हिडिओ पाहता प्रेमप्रकरणातून त्याने ही आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तपासाअंतीच सत्य उघडकीस येईल. पोलीस याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.
0 Comments