सोशल मीडियावर अनेक विनोदी व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये मुलींच्या डान्सचे किंवा मुलांनी केलेल्या विनोदी प्रयोगाचे व्हिडिओ असतात. तर अनेकदा सोशल मीडियावर मयत व्यक्ती जिवंत झाल्याची बातमीही तुम्ही ऐकली असेल.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तिरडीवर एका व्यक्तीचा मृतदेह ठेवल्याचं आपल्याला दिसत आहे. तर त्याच्या जवळ एक व्यक्ती उभा असून तो त्याच्या तोंडात सिगारेट धरत आहे. आणि तो तिरडीवरील व्यक्ती सिगारेट ओढत आहे. विशेष म्हणजे तिरडीवरील व्यक्ती मुळात मृत नाहीये, तो जिवंतच आहे पण शुटींगसाठी किंवा नाटकासाठी हा व्यक्ती तिरडीवर झोपला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, हा व्यक्ती सिगारेट ओढल्यानंतर तोंडातून धूराचे लोटही सोडत असून त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. तर अनेक नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
0 Comments