जेवणामध्ये सापडला साप, 16 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली

 


पश्‍चिम बंगालमध्ये बीरभूम जिल्ह्यात मात्र माध्यान्ह भोजनात साप आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विषारी अन्न खाल्ल्याने १६ मुले आजारी पडल्याचे सांगण्यात येत आहे. घटना बीरभूममधील मयुरेश्वर येथील मांडलपूर प्राथमिक शाळेची आहे.

आजारी शालेय विद्यार्थ्यांना रामपूरहाट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्या शाळेत आंदोलन सुरू केले.

या संपूर्ण घटनेसाठी शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शाळेत पोहोचून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन दिले जात होते. सुमारे 20 विद्यार्थ्यांना जेवण दिल्यानंतर अचानक शिजलेल्या डाळीवर मृत साप पडलेला दिसला. यानंतर मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांनी जेवण देणे बंद केले. 20 पैकी 16 विद्यार्थ्यांना जेवणानंतर उलट्या होऊ लागल्या आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदोलन करणाऱ्या पालकांचे म्हणणे आहे की, "मांडलपूर प्राथमिक शाळेत माध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी आणि शिक्षक दुर्लक्ष करतात. आज शिजवलेल्या डाळीत साप दिसला. अनेक विद्यार्थ्यांनी ही डाळ खाल्ली त्यांतर या विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली.


Post a Comment

0 Comments