शिक्षकाचा पवना धरणात बुडून मृत्यू

 


लोणावळा परिसरात कुटुंबासमवेत फिरायला आलेल्या मुंबईतील एका शिक्षकाचा पवना धरणाच्या पाण्यात बुडू मृत्यू  झाला.

घटना रविवारी (दि. 8) सकाळी अकराच्या सुमारास घडली. प्रेमप्रकाश रोशनलाल भाटिया  (वय-62 रा. कुर्ला, मुंबई) असे मृत्यू झालेल्या शिक्षकाचे नाव आहे.

भाटिया कुटुंबीय रविवारी पवना धरण परिसरातील दुधिवरे गाव परिसरात फिरण्यासाठी आले होते. सकाळी अकराच्या सुमारास प्रेमप्रकाश हे पवना धरणातील पाण्यात पोहण्यासाठी उतरले. पोहत असताना भाटिया यांना दम लागल्याने ते पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोधमोहिम राबवण्यास सुरुवात केली. दरम्यान शिवदुर्ग संस्थेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. 

शिवदुर्गच्या पथकाने भाटिया यांना बेशुद्धावस्थेत पाण्यातून बाहेर काढले.
त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून
पोलीस हवालदार विजय गाले  तपास करीत आहेत.


Post a Comment

0 Comments