उत्तर प्रदेश राज्यातील गाजीपूर जिल्ह्यात एका गावात एक भयानक घटना उघडकीस आली आहे.
पोलिसांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, जमिनीचा वाद गुरुवारी सुरु झाला. त्यावेळी विजय नावाच्या मुलाने आपल्या आईला मारहाण करायला सुरुवात केली. इतकी बेदम मारहाण केली की, शेजारच्या लोकांनी जमुनी देवी यांना रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावरती उपचार सुरु असताना मृत्यू झाला.
कोतवाली प्रभारी निरीक्षक तेज बहादुर सिंह यांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असल्याची माहिती सांगितली आहे. त्याचबरोबर या प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.
0 Comments