मकरसंक्रांतीनिमित्त घरी जाताना दुचाकी अपघातात महिला पोलिसाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनीता इश्वरसिंग ढोबाळ असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिला पोलिसाचे नाव आहे.
ढोबाळ या जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत होत्या. ही घटना राजूरजवळील ठाकूरद्वार हाॅटेलसमोर रविवारी (दि.15) सकाळच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता ढोबाळ या आपल्या दुचाकीवरून मकरसंक्रातीच्या सणानिमित्त मूळगावी जात होत्या. यावेळी राजूर जवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीची बैलगाडीला धडक बसली. यामध्ये सुनीता यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालवित असलेला त्याचा मुलगा रोहन (वय 18) हा गंभीर जखमी झाला आहे.
जखमी रोहनवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. घटनेची माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुनीता यांच्या अपघाती निधनाने पोलीस दलासह नातेवाईकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
0 Comments