दुकानदाराकडून 105 कोयते जप्त

 


शहरात कोयत्याचा वापर करुन रस्त्यांवर दहशत माजविण्याचे, लुटालुट करण्याचे प्रकार वाढत असल्याने कोयता हे हत्यार कुप्रसिद्ध झाले आहे. गुन्हेगारांवर अटकाव करण्याचा भाग म्हणून आता पोलिसांनी कोयते विक्रेत्यांवर संक्रांत आणली आहे.

भोरी आळीतील एका दुकानावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा घातला. दुकानातून नवीन विक्रीसाठी ठेवलेले १०५ कोयते जप्त केले.

आपल्या भागात भाईगिरी करण्यासाठी अनेक अल्पवयीन मुले, तरुण कोयत्याचा वापर करुन दहशत निर्माण करीत आहेत. भर रस्त्यावर गर्दीच्या वेळी कोयत्याने येणार्‍या जाणार्‍यांवर वार करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. दुकानदारांना कोयत्याचा धाक दाखवून खंडणी मागण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये कोयता हे प्रमुख हत्यार म्हणून वापर होताना दिसते. 

विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी विधानसभेत पुण्यातील कोयत्या गँगचा विषय उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगारांवर कारवाईची मोहिम हाती घेतली.
त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांच्या हाती कोयते लागू नये,
म्हणून त्याची विक्री करणार्‍या दुकानावर छापा टाकून १०५ कोयते जप्त करण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments