अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून प्रियकराने प्रेयसीला जिवंत जाळल्याची घटना उत्तर प्रदेशातील हरदोई येथे उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 जानेवारी रोजी पोलिसांना एक अर्धवट जळालेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला.
मृतदेह मिळाल्यानंतर तीन दिवसांनी महिलेची ओळख पटली. मयत महिला रसूलपूर गावची असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरु केला. पोलिसांनी महिलेच्या वडिलांकडे चौकशी केली असता त्यांनी तिच्या प्रियकरावर संशय व्यक्त केला.
मयत महिलेचा 12 वर्षांपूर्वी तस्मीर नामक व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र तीन वर्षापूर्वी तिचे शराफत नामक इसमाशी प्रेमसंबंध जुळले आणि त्याच्यासोबत राहण्यासाठी महिला पतीला सोडून गेली होती. यानंतर तिचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क नव्हता.
महिलेच्या वडिलांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी खबऱ्यांच्या माहितीच्या आधारे शराफतला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने हत्येची कबुली दिली.
शराफतने दिलेल्या माहितीनुसार, महिलेचे दुसऱ्याशी अनैतिक संबंध होते. वारंवार तिला समजावूनही ती ऐकत नसल्याने आपण तिच्या हत्येचा कट रचल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार मित्राच्या मदतीने आधी तिचा गळा आवळला, मग पेट्रोल टाकून जाळल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळावरुन महिलेचा मोबाईल, पर्स, नकाब हस्तगत केले आहे. महिलेला मारल्यानंतर आरोपी तेथन पळून गेले. मात्र पोलिसांनी शराफतला अटक केली असून, त्याच्या साथीदाराचाही शोध सुरु आहे.
0 Comments