बाई बाई पाहिल्या का ह्या पोज! नवरदेव शॉक

 


जच्या लग्नसराईत प्री-वेडिंग शूटचा ट्रेंड तुम्ही पाहिला असेलच. मात्र लग्नानंतरच्या शूटलाही चांगलीच पसंती मिळते. जयमाला किंवा लग्नानंतर वधू-वरांना फोटोशूट करता यावं यासाठी फोटोग्राफरला थोडा वेळ हवा असतो.

वधू-वरांना फोटोशूटसाठी चांगल्या ठिकाणी नेले जाते आणि नंतर फोटो क्लिक करण्यासाठी वेगळे पोज देण्यास सांगितले जाते. बहुतांश पोझ फोटोग्राफर्सनी स्वत: सांगितलेल्या असतात. पण तरी तुम्ही कधी वधू-वरांना फन स्टाइलमध्ये पोज देताना पाहिलं आहे का? नसेल तर सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ तुम्ही अवश्य पाहा.

इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही वधू-वराला फोटोशूट करताना पाहू शकता. फोटोग्राफर्स म्हणून वधू-वरांना पोज देण्याची सूचना देतात आणि ते अगदी तसंच करण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र फोटोशूटदरम्यान वधू-वरांनी अशी विचित्र पोज द्यायला सुरुवात केली, ज्याची इंटरनेटवर खिल्ली उडवली गेली.

नवरीन नवरदेवाच्या गळ्यात हात घातला आणि मग तिने आपले डोके उलट्या दिशेने मागे झुकवले. नवरदेवाने हे पाहताच तो शॉकमध्ये गेला. असे वाटत होते की, नवरदेव गोंधळून गेला. फोटोशूटदरम्यान नवरी अशी विचित्र पोज का देण्याचा प्रयत्न करत आहे, असा प्रश्न त्याला पडू लागला असेल.

काही सेकंदाचा हा व्हिडिओ आता इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून त्याची खूप मजाही केली जात आहे. सोशल मीडियावर वधू-वरांचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

हा व्हिडिओ फंटॅप नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला असून आतापर्यंत 5 हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे, तर हजारो व्ह्यूज आले आहेत. या व्हिडिओवर अनेकांनी आपले अभिप्रायही दिले.

Post a Comment

0 Comments