शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रस्त्याचे लगत जुना टोलनाका परिसरात सुरु असलेल्या मटका अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत काही रक्कम जप्त करत महेश अशोक सातपुते या मटका चालकावर गुन्हे दाखल केले आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडला असलेल्या जुना टोलनाका परिसरात मटका सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार अमोल दांडगे, पोलीस नाईक बापू हडागळे, रोहिदास पारखे, विकास पाटील यांसह आदींनी सदर ठिकाणी जाऊन छापा टाकला असता एक व्यक्ती कागदावर आकडे लिहून मुंबई मटका नावाचा मटका खेळवत असल्याचे दिसून आले. यावेळी पोलिसांची चाहूल लागताच सर्व लोक पळून गेले.
दरम्यान पोलिसांनी मटका चालक महेश सातपुते याचा पाठलाग केला असता तो देखील पळून जाण्यात यशस्वी झाला. याबाबत पोलीस नाईक रोहिदास दौलत पारखे रा. शिक्रापूर (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी महेश अशोक सातपुतेरा. आदर्श सोसायटी दोघी रोड भोसरी (ता. शिरुर) जि. पुणे याच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बापू हडागळे हे करत आहे.
0 Comments