मुलादेखत आईचा ट्रकखाली चेंदामेंदा

 


मुंबई-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघात मुलाच्या दुचाकीवर बसलेली गृहिणी खाली पडली आणि मागून सुसाट वेगात आलेला ट्रक तिच्या अंगावरून गेल्याने तिचा अक्षरशः चेंदामेंदा झाला.

मुलादेखत त्याच्या आईच्या अंगावरून ट्रक गेल्याचे पाहून प्रत्यक्षदर्शीही भेदरले होते.

सावदा येथे साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून मायलेक जळगावला दुचाकीवरून येत असताना, हा अपघात झाला. जुबेदाबी बेग अल्ताफ बेग (वय ४८) जागीच ठार झाल्या. त्यांचा मुलगा कामील बेग गंभीर जखमी झाला. अपघातांनतर ट्रकचालक फरारी झाला. 

येथील समतानगरनगरमधील रहिवासी अल्ताफ बेग यांच्या पत्नी जुबेदाबी मुलगा कामील बेग (वय २६) याच्यासोबत सावदा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी गेल्या हेात्या. साखरपुडा आटोपून मायलेक दुचाकी (एमएच १९, डीएक्स ८१५८)वरून सायंकाळी साडेपाचला जळगावला येण्यासाठी निघाले. नशिराबादकडे येत असताना, समोरून येणाऱ्या दुचाकी (एमपी ०९, एमझेड ७६३७) स्वाराने कामील बेग याच्या दुचाकीला धडक दिली.

या अपघातात दोन्ही दुचाकीस्वार खाली फेकले गेले. कामीलच्या दुचाकीवर मागे बसलेली त्याची आई जुबेदाबी महामार्गाच्या मधोमध फेकल्या गेल्या. खाली पडताच त्यांच्या अंगावरून सुसाट ट्रक गेला. ट्रकच्या चाकाखाली आल्याचे त्या जागीच ठार झाल्या. कामील बेग गंभीर जखमी झाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण द्वारे टोल नाक्यांवर नियुक्त रुग्णवाहिकेला अपघाताचा कॉल आल्यावर चालक जितेंद्र नागपुरे, डॉ. महेंद्र महाजन यांनी अपघाताच्या दिशेने धाव घेतली. ४ ते ५ किलोमीटरनंतर अपघातस्थळावर पोचल्यावर जखमींना डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. महिलेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून जिल्‍हा रुग्णालयात नेण्यात आला.

Post a Comment

0 Comments