घरफोडी करणारी टोळी जेरबंद, 70 तोळे सोने व 8 लाख रुपये हस्तगत

 



अजय सर्जा नानावत (वय 27 रा.मुळशी) कन्हैया विजय राठोड (वय 19 रा. मावळ), आशा राजूभाई ठक्कर (रा. गुजराथ) यांना अटक केली असून अनिरुद्ध योगेश राठोड उर्फ नानावत व त्यांचे इतर दोन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट चांदेरे रा. सुसगाव यांनी 25 डिसेंबर रोजी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार 23 ते 24 डिसेंबर दरम्यान घरफोडी करून चोरट्यांनी घरातील 119 तोळे सोने व रोख रक्कम चोरून नेली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली व परिसरातील 57 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहिले.

तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सुसगाव घरफोडीतील संशयीत हा दुचाकीवरून बापुजी मंदीर येथे येणार आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

चौकशीत त्याने त्याचे नाव अजय सांगितले. त्याने गुन्हा कबुल केला व सांगितले की तो स्वतः दिवसा घरांची रेकी करत असे व त्याचे साथीदार कन्हैया, मोहन, अनिरुद्ध यांच्या मदतीने घरफोडी करत असे. चोरी केलेला माल आरोपी अहमदाबाद येथील आशा ठक्कर ला विकला त्याचे ठक्र हिने 8 लाख रुपये बँक खात्यात जमा केले.

पोलिसांनी तपास तेथेच न थांबवता हिंजवडी पोलिसांची एक टीम गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान येथे जाऊन सलग 15 दिवस राहिली. ठक्कर ही पुण्यात येणार अशी माहिती मिळताच पोलिसांनी तीला पुण्यातून ताब्यात घेतले. तिच्याकडून पोलिसांनी तपासात 66 तोळे सोने जप्त केले. अशा प्रकारे पोलिसांनी या तपासात अजय कडून 4 तोळे सोने व 8 लाख रुपये व ठक्कर कडून 66 तोळे सोन असे एकूण 70 तोळे सोने व 8 लाख रुपये ऐवज जप्त केला.

या तपासात पोलिसांनी तीन घरफोडी उघडकीस आणल्या. आरोपी अजय नानावत याच्यावर यापुर्वीही एकूण 32 गुन्हे दाखल असल्याचे तर ठक्कर वर 6 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक गुन्हे सुनिल दहिफळे, सोन्याबापु देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, पोलीस उपनिरीक्षक अजीत पाटील, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे,  कुणाल शिंदे, बापुसाहेब धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडित , सुभाष गुरव, सोनाली ढोणे, ऋती सोनावणे, शालीनी वचकल यांनी केली.

Post a Comment

0 Comments