पुणे - सोलापूर महामार्गावर स्विफ्ट कारला भीषण अपघात

 


पुणे : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्विफ्ट कारला भीषण अपघात झाला असून, या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त हे लातूर जिल्ह्यातील आहेत.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) पहाटे पावणेचारच्या दरम्यान सोलापूर-पुणे या लेनवर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 1 गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे पुण्याच्या दिशेने येणारी ही कार वाहन क्रमांक एम.एच.43 बी.एन.1402 भिगवण बस स्थानकापासून जवळच उतारावर पलटी झाली. या अपघातामध्ये तिंघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रकांत रामकिशन गवळी (वय 54, रा. ज्योती नगर लातूर) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे.


Post a Comment

0 Comments