निगडी परिसरातील दुर्गानगर येथे एका लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला. लॉजवर छापा मारून दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करत पोलिसांनी लॉज मॅनेजरला बेड्या ठोकल्या आहेत.
कारवाई शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी न्यू विसावा लॉज येथे करण्यात आली.
लहू श्रीराम ऐडके (वय 28, रा. निगडी. मूळ रा. भंडारवाडी, जि. उस्मानाबाद) असे अटक केलेल्या लॉज मॅनेजरचे नाव आहे. त्याच्यासह लॉज चालक जितेश रमेश कुंदर (वय 47, रा. निगडी), जयप्रकाश शेट्टी (वय 40, रा. मुंबई) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक गणेश कारोटे यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गानगर येथील न्यू विसावा लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लॉजवर शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी लॉजमध्ये दोन पीडित महिला आढळल्या. त्यांची वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केली. लॉज मॅनेजर लहू याला अटक 11 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. लॉज चालक आणि अन्य एकाचा पोलीस शोध घेत आहेत.
0 Comments