धक्कादायक; पतीने केली पत्नीची गळा आवळून हत्या

 


नालासोपारा (मंगेश कराळे) - विरारच्या शंकरपाडा परिसरात राहणाऱ्या पत्नीची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जेजे रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालावरून हत्येचा उलगडा झाला आहे.

विरार पोलिसांनी १ फेब्रुवारीला अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. पोलिसांना संशय आल्याने मृतदेह शवविच्छेदनला पाठविण्यात आल्यावर हे बिंग उघडकीस आले आहे. पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी करत आहे. तर फरार आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

शंकर पाड्यातील जीवदानी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या प्रियंका उर्फ पिंकी पाटील (२५) हिचा मृतदेह १ फेब्रुवारीला राहत्या घरात विरार पोलिसांना मिळाला होता. तिचा पती तिच्याजवळ नव्हता व त्याचा मोबाईल बंद होता. त्यामुळे विरार पोलिसांना संशय आला होता. पोलिसांनी तिचा मृतदेह शवविच्छेदनसाठी मुंबईच्या जे जे रुग्णालयात पाठविण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी पतीचा शोध घेत असताना व्हाट्सअपच्या स्टेट्सवर त्याने आई वडील मला माफ करा, मी काही वेगळे काम करणार आहे असा मॅसेज ठेवला होता. तसेच तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमी भांडणे होत असल्याची उपयुक्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

शवविच्छेदन अहवाल आल्यावर हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी रात्री हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत असल्याने ही हत्या केली आहे. त्याचा साथीदार संकेत राऊत या आरोपीला ताब्यात घेतले असून फरार पतीचा शोध घेत आहेत. राजेंद्र कांबळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे)


Post a Comment

0 Comments