नगर: शिक्षकानेच काढला आपल्या प्रेयसीचा काटा

 


अकोले  : प्रेम प्रकरणातून शिक्षकानेच आपल्या प्रियसीचा काटा मित्रांच्या मदतीने काढल्याची घटना तालुक्यातील शेंडी येथे घडली आहे. भारती दत्तु खांदे (वय.21, रा.

शेंडी)असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. दत्तू धोंडू डगळे, मनोज पुनाजी कोरडे (वय 21 रा. वासळी), अमोल गोपाळे असे या घटनेतील आरोपींची नाव आहे. अकोले तालुक्यातील शेंडी येथे असलेल्या भारती दत्तु खांदे ही21 वर्षीय ही मुलगी दि.14 जानेवारी रोजी शेंडी येथे बचत गटाच्या मिटींगला जात असल्याचे सांगुन घरातून निघून गेली होती. तिच्या नातेवाईकांनी दि.15 जानवारी 2023 रोजी बेपत्ता झाल्याची नोंद राजूर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

त्यादृष्टीने राजुरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे, पो.हे.काँ.दिलिप डगळे यांनी तपासाची चक्र फिरवत इगतपुरी, घोटी, नासिक, संगमनेर परिसरात मुलीचा शोध घेतला. परंतु पोलिसांना हाती काही लागले नाही. त्यानंतर मुलीचे नातेवाईक व तांत्रिक तपास करत पोलिसांनी गोपनीय माहिती घेत नाशिक येथील अमोल शांताराम गोपाळे (वय 33) याला राजूर पोलिसांनी नाशिकहून ताब्यात घेतले.
संशियित अमोल गोपाळे यांनी दत्तू धोंडू डगळे (वय 42, रा. वासळी जि. प. शाळा वासळी येथे शिक्षक असून व मनोज पुनाजी कोरडे (वय 21 रा. वासळी) या दोघांनी आंबेवाडी परिसरात भारतीला घेऊन मारहाण केल्याचे सांगितले. राजूर पोलिसांनी दत्तू धोंडू डगळे व मनोज पुनाची कोरडे यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर भारती हिला बोलावून आंबेवाडी परिसरात मारून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरीता शहापूर तालुक्यातील किनवली परिसरातील साकुरली मध्ये बंद दगडाच्या खाणीतील पाण्यात टाकल्याचे सांगितले. राजूर पोलिसांनी तिन्ही आरोपींना घेऊन शहापूर तालुक्यातील साकुरली परिसरातील घटनास्थळी पाहणी केली. तर किनवली पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी राजूर पोलिस गेल्यावर पोलिस तपासात शहापूर तालुक्यातील किनवली परिसरातील साकुरली परिसरातील बंद दगडाच्या खाणीतील पाण्यात 21 वर्षाच्या मुलीचे प्रेत दि.16 जानेवारीला आढळून आल्याने किनवली पोलिस स्टेशनमध्ये अज्ञान इसमाविरोधात 302 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भारती दत्तु खांदे तिच्या मुतदेहाची ओळख पटविण्यात राजूर पोलिसांना यश आले. तसेच भारतीचे मारेकरी चक्क किनवली पोलिस स्टेशनमध्ये आणल्याचे पाहताच किनवली पोलिस चक्रावून गेले.राजूर पोलिसांनी अमोल गोपाळे, दत्तू धोंडू डगळे, मनोज पुनाजी कोरडे या तिनही आरोपींनी वासळी, बारी, आंबेवाडी परिसरात आणुन घडलेल्या गुन्ह्याची चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली.


Post a Comment

0 Comments