सांगली: साडेचार लाखाची रोकड डफळापुरात पळवली

 


डफळापूर येथील भर मध्यवस्तीतील जंगलूदिन बंडू पठाण यांचे घर पडून अज्ञात चोरट्यांनी 4 लाख 40 हजाराची रोख रक्कम लंपास केली आहे.

चोरीचा हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला.

याबाबत जत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जंगलूदिन पठाण हे मूळचे तासगाव येथील रहिवासी आहेत. पठाण यांच्या नातीच्या दि. 26 फेबुवारीला साखरपुडा ठेवण्यात आला आहे. त्यांच्या तयारीसाठी मंगळवारी पठाण सहकुटुंब तासगाव येथे गेले होते. घरी त्यांनी द्राक्ष विकून 4 लाख 40 हजार ठेवले होते. चोट्याने त्यांचे घर फोडून ही रक्कम लंपास केली. याबाबत जत पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राजश्री गायकवाड करीत आहेत.


Post a Comment

0 Comments