गाडीतून उतरताच महिलेला वाघाने नेलं ओढत, अंगावर काटा आणणारा video व्हायरल

 


नवी दिल्ली : जंगलातील अनेक प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक प्राणी सर्रासपणे कुठेही फिरताना दिसत आहे. त्यामुळे लोकांमध्ये बऱ्याचदा भीतीचं वातावरण दिसून येतं.

अनेक प्राण्यांचे हल्ल्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर समोर येत असतात. अशातच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सध्या व्हायरल व्हिडीओमधून वाघाची दहशत पहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडिओ चीनमधील बीजिंगजवळील बादलिंग वाइल्डलाइफ वर्ल्ड अॅनिमल पार्कमधील आहे.

जिथे पर्यटकांना सफारी दरम्यान त्यांची वैयक्तिक वाहने नेण्याची परवानगी होती. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रस्त्यावर अचानक एक कार थांबते आणि एक मुलगी त्यातून खाली उतरते आणि गाडीच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडते, तेवढ्यात एक वाघ येतो आणि महिलेला ओढत नेतो. हे पाहून तिचा नवरा पटकन बाहेर आला आणि तिच्या मागे धावला, तेवढ्यात मागच्या सीटवर बसलेली दुसरी महिला गाडीतून बाहेर आली जी वाघाने पकडलेल्या मुलीची आई होती. तीही आपल्या मुलीच्या मागे जंगलाकडे धावली.

व्हायरल व्हिडीओ पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. व्हिडीओमध्ये वाघाची दहशत दिसून येत असून हा व्हिडीओ सध्या सोशल माध्यमांवर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जुना असून तो पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. त्यामुळे जंगल सफारीसाठी गेल्यावर अतिरिक्त काळजी घेण्याची गरज असून नेहमीच सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.

व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या खूप साऱ्या कमेंट येत आहेत. जंगल सफारीदरम्यान हल्ला होण्याचं हे पहिलंच प्रकरण नाही. असे अनेक हल्ल्याचे व्हिडीओ समोर येत राहतात. यामुळे पर्यकांच्या मनातही दहशत निर्माण होते.

Post a Comment

0 Comments