हृदयद्रावक: आई - वडील पोटच्या गोळ्याला शेवटच पाहुही शकले नाहीत

 


वलगावकर दाम्पत्यावर काळाने असा प्रसंग आणला की आपल्या पोटच्या गोळ्याला ते शेवटचं बघू पण शकले नाहीत. पाच वर्ष ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं, ज्याचे लाड पुरवले, ज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वकाही करण्याची तयारी असलेल्या कुटुंबावर हा प्रसंग आल्याने अनेकांचे डोळे पाणावलेले होते.

गुरुवारी डवरगाव येथील अपघातात अन्वित एसटी बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. तर, आई-वडील दोघेही जखमी अवस्थेत रुग्णालयात होते. यावेळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करणं गरजेचं होतं. मात्र, द्विधा अवस्थेत असलेल्या परिवारातील सदस्यांनी तसेच मित्रमंडळींनी आई-वडिलांच्या पश्चात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आणि अंतोरा येथे त्याच्या मूळ गावी जड अंतःकरणाने त्याला अखेरचा निरोप देण्यात आला.

वर्धा जिल्ह्यातील अंतोरा आष्टी येथील पंकज वलगावकर हे पत्नी कविता आणि मुलगा अन्वित यांच्यासोबत आपल्या दुचाकीने अमरावतीला येत होते. तेवढ्यात मागून भरधाव येणाऱ्या वरुड अमरावती एसटी क्र.एम एच ०६, एस८९५९ ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये समोर बसलेला अन्वित हा थेट एसटी बसच्या चाकाखाली आला आणि या पाच वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. पंकज आणि कविता दोघेही या अपघातात गंभीर जखमी झालेत.

घटनेनंतर माहुली जहागीर पोलिसांनी एसटी बस चालक दामोदर काशीरावजी नांदूरकर (राहणार परशुराम नगर मोर्शी याच्यावर भादंवि २७९,३३८,३०४(अ) अन्वये गुन्हा दाखल केला करून अटक करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments