खंडणीसाठी तरूणाचे अपहरण, बेदम मारहाण

 


मांडवीवरील कॅसिनोवर गेलेल्या हैदराबाद येथील शेख कादर बाशा (32) याचे अपहरण करून व त्यानंतर त्याला बेदम मारहाण करून त्याच्या पत्नीकडे 90 हजारांची खंडणीची मागणी करणाऱ्या तिघांना पणजी पोलिसांनी अटक केली.

गुन्ह्यातील इतर चौघे फरारी आहेत.

अबुझर गफार कोतवाल (42, सांकवाळ), रमेश सीताराम सतरंगी (32, पणजी) व सिंधू मुकेश पसवार (22, ताळगाव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

गणेश पंजल व उल्हास तसेच इतर दोघेजण फरारी आहेत. पर्यटनासाठी आलेला तक्रारदार शेख कादर बाशा हा रविवारी सकाळी एका कॅसिनोमध्ये गेला होता. तेथून त्याला दोघांनी जबरदस्तीने बसवून मिरामार येथील उद्यानात नेले. तेथे आणखी पाचजण येथे आले.

त्यांनी त्याला मारहाण करत त्याच्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला. यावर पत्नीने पैसे पाठविण्यासाठी संध्याकाळपर्यंतची वेळ मागितली. या दरम्यान तिने पणजी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी त्वरित बाशा याचे मोबाईल लोकेशन काढून कामराभाट-करंझाळे येथून त्याची सुटका केली.

Post a Comment

0 Comments