तारण सोने सोडविण्यासाठी केली 2 लाखांची फसवणूक

 


नाशिक : तारण ठेवलेले सोने सोडवून देण्यासाठी त्याच्याकडून दोन लाख रुपये घेत एकाची फसवणूक केली. याप्रकरणी खासगी एजंटवर पंचवटी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि 

अपहाराचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे

प्रथमेश श्याम पाटील (रा. काझीगढी, मोदकेश्वर वसाहत) असे संशयिताचे नाव आहे. वैभव सुनील होनराव (रा. पाल्म रेसीडेन्सी, सोनवणे मळा, सामनगाव रोड) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी बजाज फायनान्सकडे सोने तारण ठेवले आहे. त्यांना हे सोने सोडवायचे होते. त्यावेळी त्यांचा परिचय संशयित प्रथमेश पाटील याच्याशी झाला.

गेल्या शुक्रवारी (ता.१७) सकाळी अकराच्या सुमारास पाटील याने थत्तेनगर येथील बजाज फायनान्सच्या क्रोमा शोरूम येथे तुमचे सोने सोडवून देतो, असे म्हणून प्रोसेसिंग फी व अन्य कारणे सांगून दोन लाख रुपये उकळले.

मात्र सोने काढून न देता होनराव यांची फसवणूक केली. याप्रकरणी पंचवटी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संशयित पाटीलचा शोध घेत आहेत. सहायक निरीक्षक पाटील तपास करीत आहेत

Post a Comment

0 Comments