सिन्नर (जि. नाशिक) : दोन शाळकरी मुले घरातून बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी काल (दि. १६) सिन्नर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरला सदाशिव गुंजाळ (३५) रा. कानडी मळा व त्यांचे पती या मजुरीचे काम करत असून त्यांना १२ वर्षांचा रोहन व ११ वर्षाचा आकाश असे दोन मुले आहेत. बुधवारी दुपारी मुले शाळेतून आले असता आपल्या घरासमोर खेळत होते. मात्र, त्यांनतर काही वेळाने दोन्ही मुले तेथून बेपत्ता झाले. सरला व सदाशिव यांनी दिवसभर मुलांचा शहर परिसरात तसेच
नातेवाईक, मित्रांकडे शोध घेतला. मात्र, त्यांचा कुठेही तपास लागला नाही. रात्रभर वाट बघूनही दोन्ही मुले घरी परतले नाही. काल दिवसभरही मुलांचा तपास न लागल्याने त्यांनी रात्री सिन्नर पोलिस ठाण्यात येत अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाची तक्रार दाखल केली आहे.
रोहन ६ वीत शिकत असून रंगाने गोरा, शरिराने सडपाळ, उंची ३.६ फुट, केस काळे व मोठे आहे. तर आकाशही ६ वीत असून रंगाने सावळा, शरिराने सडपातळ, डोळे काळे, उंची ४ फुट अंदाजे, केस काळे व मोठे आहे.
दोन्ही मुलांनी अंगात पिवळसर रंगाचा शर्ट पॅन्ट घातलेले होते. तसेच दोघांकडेही शाळेच्या वह्या पुस्तके असलेले काळ्या रंगाचे दप्तरही होते. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरक्षक सुदर्शन आवारी करीत आहेत.
0 Comments